You are currently viewing हृद्यगंध

हृद्यगंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हृद्यगंध*

********

झाकता , मीच माझिया अंतरी

उमले लोभस प्रीतकळी लाघवी….

 

भावभावनांचा हृद्य गंध परिमल

उमाळा अंतरात पाझरतो मार्दवी….

 

जरी पडसाद , सुखदुःख वेदनांचे

बिनबोभाटी , झेलतो मी जीवनी….

 

जगण्याचे अंदाज सारे कृतार्थतेचे

श्वासासंगे क्षणक्षण जाती विरुनी….

 

सावरतो , तोच एक निळासावळा

सदैव माझ्याच हातास घट्ट धरुनी….

****************************

*रचना क्र. ७ / १०/२०२४*

*#©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞(9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा