*उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आयोजित वेंगुर्ला येथील आरोग्य शिबिरात २०४ जणांची आरोग्य तपासणी*
*एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल , पडवे चे सहकार्य*
*वेंगुर्ला शाळा नं १ च्या नियोजनबद्ध आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक*
वेंगुर्ला:
जि प पूर्ण प्रा.शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री वैद्यकीय कशामार्फत आणि एसएसपीएम मेडीकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या आरोग्य शिबिरात एकूण २०४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या महा आरोग्य शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग प्रतिनिधी डॉ.पूजा कर्पे यांच्या हस्ते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,माजी गटविकास आधिकारी बाबली वायंगणकर, डॉ,संजय जोशी,डॉ.योगेश केंद्रे, डॉ.निलेश मैत्रे,डॉ.ऐश्वर्या जगताप, समन्वयक संजय पिळणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, वृंदा मोर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलननाने करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी,ब्लड प्रेशर,शुगर तपासणी, नेत्र तपासणी,रक्त तपासणी,दंतरोग तपासणी,अस्थीरोग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.यावेळी २८ जणांची ECG तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ.पूजा कर्पे यांचा प्रशालेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेली मोफत वैद्यकीय शिबीरे व ह्या शिबिरांचा गोरगरीब जनतेला मिळत असलेला लाभ , याबाबत उपस्थितांना माहीती दिली . डाॅ . पूजा कर्पे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारच्या आरोग्य विषयक विविध योजनांची विस्तृत माहिती दिली.उपस्थित सर्व मान्यवरांनी या शिबिराच्या उत्कृष्ठ नियोजनाबाबत विशेष कौतुक केले व समाधान व्यक्त केले.यावेळी पालक,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व व्यवस्थापन समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक या शिबिराचे समन्वयक संजय पिळणकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी मानले.