महा विकास आघाडी महिला द्वेशी,त्यांना लाडकी बहिण योजनेतून माता-भगिनींना मिळणारे पैसे पाहवत नाहीत
*भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली टीका
कणकवली
महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव,येणारी दिवाळी,आणि प्रत्येक महिना महाराष्ट्रातील माता भगिनींना उत्साहाचा आणि आनंदाचा जाणार आहे. महायुती सरकार, मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री या भावनंबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम,आपुलकी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हृदयात महायुती सरकारबद्दल प्रभावी जागा निर्माण झालेली आहे.त्याच मुळे आमचे विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीतील उबाठा,काँग्रेस, तुतारीवाले यांची झोप उडाली आहे.त्यांना ही योजनाच बंद करायची आहे. म्हणून या योजने संदर्भात खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते.
खोटे बोलायचे आणि कोर्टासमोर अटक करू नका म्हणून माफी मागायची यात संजय राऊत ने प्रथम क्रमांक मिळवला आहे.मध्यप्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना सुरळीत चालू आहे.सर्व महिला भगिनींना चांगल्या प्रकारे दर महिन्याला लाभ मिळतो आहे. असे असताना संजय राऊत ही योजना मध्यप्रदेश मध्ये बंद झाली अशी खोटी माहिती देत असतील तर त्यांनी याबद्दलचा एक तरी पुरावा द्यावा. अन्यथा महाराष्ट्रातील माता भगिनींनसमोर नाक घासून माफी मागावी. असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.
मुख्यमंत्री लाडके बहीण योजना खूपच चांगली आहे.अशा प्रकारचे कौतुक प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी केले.यातूनच आमच्या महायुती सरकारचे यश दिसून येते. त्यामुळे संजय राऊत सारख्या तीनपट लोकांनी यावर बोलू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना.ह्यांच्या काळात साधा शक्ती कायदा आणू शकले नाहीत कारण ह्यांच्यात सगळे शक्ती कपूर च्या भूमिकेत आहेत.अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला आहे. स्वतःचा मालक कोणाच्या जीवावर घर चालवतो हे आधी त्यांनी बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. ह्यांना मोती साबण घेणं पण जड झालं आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजने बद्दल गळा कडत फिरत आहेत.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.