You are currently viewing मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत

सावंतवाडी :

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल  केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा द्यावा या कोकण मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्रातील साहित्यिक आणि मराठी भाषा प्रेमी यांच्या कित्येक वर्षाच्या मागणीला यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विशेष राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे हा अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला. त्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आता त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी आणि मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत. असा बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची कार्यकारणीची बैठक सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर अध्यक्ष ऍड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सचिव प्रा .प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, प्रांत सदस्य लेखिका उषा परब, जिल्हा खजिनदार भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ दीपक तुपकर. ऍड अरुण पण दूरकर. ऍड नकुल पारसेकर, दीपक पटेकर, सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ ऋतुजा सावंत भोसले, सौ मंगल नाईक आधी उपस्थित होते.

यावेळी १३ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या साहित्य सदस्यांचा गौरव केला जाणार आहे. असे नियोजन करण्यात आले. वर्षभरातील साहित्य साहित्य संमेलन संदर्भात नियोजन करण्यात आले. यावेळी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले. यामुळे आता समृद्ध असलेल्या मराठी भाषेचे संवर्धन व जतन होण्यास चालना मिळाली आहे. असे सर्वांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा