You are currently viewing महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार आर. जी. पाटील यांना प्रदान

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार आर. जी. पाटील यांना प्रदान

सावंतवाडी :

 

दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक रोहन गोविंद पाटील यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते आर जी पाटील यांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सावंतवाडीत नवसरणी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे, कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे, राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे, कार्याध्यक्ष किरण मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. आर जी पाटील यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक आदर्श विद्यार्थी घडविले. या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धा पर्यंत मजल मारली. आर. जी. पाटील‌ यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे कै बाबुराव पाट्येकर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तसेच कैकै बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन कऱण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा