*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्री माहूरगड वासिनी”*
रेणुका माऊली स्फूर्ती दाती जगन् माता
कल्पवृक्षाची सावली पूर्ण करी मनोरथाIIधृII
सह्याद्री पार्वती बैसली माहूरगडा
साडेतीन शक्तीपीठां पैकी ज्ञात देवता
त्रेतायुगी अवतरे परशुराम माताII1II
सुलोचना दशभुजा हाती त्रिशूल गदा
करी कमळ धनुष्यबाण खड्:ग सदा
असुर मर्दिनी व्याघ्रारूढ शिरी चंद्रघंटाII2II
मंदिरे आहेत जमदग्नी अत्रि अनुसया माता
परशुराम दत्तशिखर मातृतिर्थ प्रसिद्धा
विष्णुदासांनी रचिली कवने ठेवा मोठाII3II
अलंकार आकर्षणतेचे प्रतिक चंद्रघंटा
देई धन विद्या सजगता धैर्य खंबीरता
संत गुलाबरावां सह देई ज्ञान सर्वांनाII4II
भक्ता साठी धावे करी आकांक्षा पूर्तता
सुदर्शने मिळते सुख सुगंध सुबत्ता
देवीचे उपासनेनं नष्ट होती पाप बाधाII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.