*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*४) भगवा/केशरी रंग*
प्राचीवरती बालरवी
रंग केशरी येई नभा
भानु क्षितिजास टेकता
मावळतीस केशरी आभा
रसाळ, मधूर चवीची
फळे नारंगी बहुगुणी
मन होई अतिप्रसन्न
केशरी सुंदर पुष्पांनी
भगवा रंग पावित्र्याचा
मंदिरशिखरी झळकतो
यशाचे निशाण रोवण्या
किल्ल्यावरती फडकतो
इंद्रधनुच्या सप्तरंगी
शोभुन किती दिसे छान
राष्ट्रध्वज तिरंग्यातही
पटकावतो मानाचे स्थान
अलिखित असे नियम
शुभकार्यात केशरी रंग
राजपुतांच्या आयुष्यात
केसरिया अविभाज्य संग
शिरावरती केशरी फेटे
पुरुषांची नसे मक्तेदारी
मिरविती अभिमानाने
नारी घेण्या सिद्ध भरारी
शिधापत्रिकेचा रंग केशरी
ओळख परिस्थितीची
व्यवस्थेची एकेक पायरी
उतरंड दाविती गरीबीची
हिरव्या भाज्यांचे रंगबदल
संशोधित प्रयोगांती
अस्सल चवी दूर्मिळ, परि
नयनांना बहू सुखावती
एक रंग, नावं अनेक
केशरी, नारिंगी, भगवा
ऊर्जादायी असे रंग हा
सर्वांनाच वाटे हवा हवा
@भारती महाजन-रायबागकर
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.