You are currently viewing कणकवली येथे “हत्ती घूस रेडा गेंडा” या नाटकाचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली येथे “हत्ती घूस रेडा गेंडा” या नाटकाचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली :

 

आचरेकर प्रतिष्ठान तर्फे कणकवली येथे “हत्ती घूस रेडा गेंडा” या नाटकाचा शुभारंभ कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते झाला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोन महान पुरुषांच्या जयंतीदिनी या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग आचरेकर प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. या नाटकाचा पहिलाच प्रयोग हाउसफुल झाला तसेच जवळपास १०० पेक्षा अधिक रसिक प्रेक्षकांना परत जावे लागले. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे रसिक प्रेक्षकांना १ तास ४० मिनिटे खेळवून ठेवणारा हा नाट्य प्रयोग आहे. हे नाट्य प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या विचाराला व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करते. त्याच्या विचाराला हत्तींचे बळ देते अशी अजरामर कलाकृती आहे.

सध्या या नाटकाची जोरदार चर्चा कणकवली येथे सुरू आहे. हे नाटक प्रत्येक भारतीयांनी पाहिले पाहिजे असे म्हटले तर अजिबात वावगे होणार नाही. मी एक रसिक आहे शिवाय एक सृजनशील आणि संवेदनशील अधिकारी आहे. सांस्कृतिक चळवळीमुळे मी एक संवेदनशील अधिकारी म्हणून घडलो आहे. हे मी विनम्रपणे सांगू इच्छितो. मी आज या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग एक रसिक प्रेक्षक म्हणून पाहण्यासाठी गेलो असता मला आचरेकर प्रतिष्ठान यांनी उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून सन्मानित केले. शिवाय बोलण्याची संधी सुद्धा दिली हे मी माझे भाग्य समजतो. यासाठी मी आचरेकर प्रतिष्ठानचा अतिशय आभारी आणि ऋणी असल्याची भावना कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा