You are currently viewing वेंगुर्ल्यातील १४ माध्यमिक शाळांना सोलार हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर

वेंगुर्ल्यातील १४ माध्यमिक शाळांना सोलार हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सौरक्रांतीला चालना*

 

वेंगुर्ला :

शेतकऱ्यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाअभियान – पीएम कुसुम, घरोघरी छतावर सौर उर्जा निर्मिती पॅनेल्स बसवुन वीज निर्मितीसाठी रुफ टाॅप सोलर योजना, सोलर पार्क उभारणी, संपुर्णपणे सौर उर्जेवर शहर चालवुन सोलर सिटी विकसित करणे अशा विविध योजना मोदी सरकारने हाती घेतल्या आहेत. त्यामुळेच संपुर्ण देशभर बदल होत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सिंधुदुर्गात पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांकरीता सोलर हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर केले आहेत. यामुळे माध्यमिक शिक्षण संस्थेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बर्‍याच माध्यमिक शाळांमध्ये इन्व्हर्टर नसल्यामुळे विजपुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयीन कामकाज करणे कठीण होत होते, परंतु आता इन्व्हर्टर ची सुविधा मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

*वेंगुर्ले तालुक्यातील खालील शाळांना हायब्रिड ईन्व्हर्टर मंजुर*

१) अणसुर पाल हायस्कूल , अणसुर.

२) वेंगुर्ला हायस्कूल , वेंगुर्ला .

३) श्री.देवी सातेरी हायस्कूल , वेतोरे .

४) बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय , वेंगुर्ले .

५) आर.के.पाटकर हायस्कूल आणि आर.सी.रेगे ज्यु.काॅ.वेंगुर्ला

६) न्यु.इंग्लिश स्कूल उभादांडा .

७) अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर , परुळे

८) कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल , आडेली

९) आसोली हायस्कूल , आसोली

१०) दाभोली हायस्कूल , दाभोली

११) न्यु.इंग्लिश स्कूल , मातोंड

१२) गुरुवर्य बावडेकर विद्यालय अँड बी.एम.काॅलेज , शिरोडा

१३) डाॅ. आर.डी खानोलकर हायस्कूल , मठ

१४) श्री.माऊली विद्यामंदिर , रेडी .

रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता कणकवली काॅलेज येथे कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ व वैभववाडी या तालुक्यातील माध्यमिक शाळांना वितरित करण्यात येणार आहेत.

तसेच सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आर.पी.डी.हायस्कूल, सावंतवाडी येथे वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या तीन तालुक्यातील माध्यमिक शाळांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सोलर हायब्रिड ईन्व्हर्टर चे वाटप करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा