You are currently viewing जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

सन 2024-25 या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव  21 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.   

युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन 2024-25 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करून राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सव सन 2024-25 मध्ये संकल्पना आधारित बाबीसाठी “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” Innovation in Science and Technology” ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा कीड़ा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2024-25 या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्लाय दि.21 नोव्हेबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (लवीन) सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये खालीलप्रमाणे स्पर्धात्मक बाबीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली सोबत दिलेल्या गुगल लिंकवर देण्यात आलेली असून युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरण्यात याव्यात.

https://docs.google.com/forms/d/1WztBkNQLtCzFbJMa91w5N64Ym8HvIw8CSmkHxl D7w5s/edit.

 सांस्कृतिक – समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकास- कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) फोटोग्राफी. संकल्पना आधारित स्पर्धा- महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान. युवा कृती- हस्तकला, वस्रोद्योग, अॅगो प्रोडक्ट.

 जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी तसेच सहभाग होण्यासाठी गुगल लिंकवर दि.20 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरण्यात यावे. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थोतील जास्तीत जास्त युवक युवती संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा