सलग तीन वर्ष ”पथनाट्य” मध्ये सुवर्णपदक मिळवत महर्षी कर्वे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचे युवा महोत्सव मध्ये भरघोस यश –
रत्नागिरी
विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी एम् एम पी शहा कॉलेज, माटुंगा आणि दिनांक 27 सप्टेंबर 2024 एस एन डी टी चर्चगेट येथे नुकतीच पार पाडली. एम.एम.पी. शहा कॉलेज माटुंगा येथे साहित्य ,ललित कला आणि नृत्य कला या स्पर्धा घेण्यात आल्या, तर एस.एन.डी.टी.च्या चर्चगेट येथे थिएटर आणि संगीत या स्पर्धा घेण्यात आल्या. या युवा महोत्सवामध्ये मुंबई, पुणे ,सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ,बीड ,नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 41 महाविद्यालये सहभागी झाली होती. या युवा महोत्सवामध्ये महर्ष कर्वे महिला महाविद्याल रत्नागिरी मधील एकूण 32 विद्यार्थिनी अंतिम फेरीमध्ये सहभागी होऊन त्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे.
डान्स (लोकनृत्य) या इव्हेंटला कास्यपदक( तृतीय क्रमांक), रांगोळी कास्यपदक (तृतीय क्रमांक)- सृष्टी विचारे, मराठी कविता वाचन रौप्य पदक (द्वितीय क्रमांक)-आकांक्षा जोशी, मराठी निबंध मध्ये उत्तेजनार्थ आर्या दाते यांना पारितोषिके मिळाली.
थिएटर इव्हेंट मधील पथनाट्य सुवर्णपदक (प्रथम क्रमांक), स्कीट (नाटक)- रौप्य पदक (द्वितीय क्रमांक), माईम (मूकनाट्य) रौप्य पदक (द्वितीय क्रमांक), वन एक्ट प्ले (एकांकिका) कांस्यपदक (तृतीय क्रमांक ) ,मिमिक्री – उत्तेजनार्थ आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मंजिरी कांबळे हिला उत्तेजनार्थ इत्यादी पारितोषिक मिळाली. BCA कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सलग तीन वर्ष पथनाट्य साठी सुवर्णपदक मिळवले आहे.
सर्व विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा.प्रतिभा लोंढे तसेच थिएटर साठी मयूर साळवी, श्रेयश- माईन ,साहिल चरकरी व नृत्य दिग्दर्शक म्हणून रुपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थिनींचे BCA महाविद्यालयाच्या प्र .प्राचार्य स्नेहा कोतवडेकर ,रत्नागिरी प्रकल्पाच्या अध्यक्ष मा.श्रीमती विद्या कुलकर्णी ,प्रकल्प प्रमुख मा. श्री मंदार सावंत देसाई तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.