You are currently viewing घावनळेत 8 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा…!

घावनळेत 8 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा…!

घावनळेत 8 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा…!

सावंतवाडी

घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.
या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक 5000 रु व चषक, द्वितीय क्रमांक 3000 रु व चषक, तृतीय क्रमांक 2000 रु व चषक तर लहान गटासाठी प्रथम क्रमांक 3000 रु व चषक,
द्वितीय क्रमांक 2000 रु व चषक, तृतीय क्रमांक 1000 रु व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेतील
सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील
इच्छुक स्पर्धकांनी राजकुमार घावनळकर 9421416894 आणि मायकल फर्नांडिस 9923099547 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा