You are currently viewing पत्र घरातल्या गृहिणीस

पत्र घरातल्या गृहिणीस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल मंच समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*

 

*पत्र घरातल्या गृहिणीस*

 

प्रिय गृहिणीस,

सप्रेम नमस्कार वि वि.

 

मुद्दाम पत्रास कारण की, आज पासून नवरात्री नवदुर्गेचा उत्सव सुरू झालाय सगळीकडे सर्व दुर्गाभक्त घरा घरात रिती रिवाजाप्रमाणे घट स्थापना करून

दुर्गेची पुजा करतात. तू ही तुझ्या घरात देवीची स्थापना करून पुजा करत असशीलच.

 

पण खरं सांगू का मला ना तूच *दुर्गाच* भासते.

आदिशक्ती, आदिमाया,ही रूपे तुझ्यात दिसतात. दुर्गेच्या नऊ रुपापैकी बरीच रुपे तू नीट साभांळते म्हणजे, देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे असतात ना म्हणजे उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

तू बहूतेक सौम्य रुपेच धारण करते.

सध्याच्या परिस्थित जुळवून व स्वतःचे शील साभांळयचे तर तुला वेळ प्रसंगी उग्र रुपे ही बाळगावी लागतात कारण तुला घराबाहेर कामासाठी निघावे लागतेच आणि विकृत माणसापासून तुझ्या संरक्षणासाठी तुला वेळ प्रसंगी काली, चंडिका, महिषासूर मर्दिनी अशा रूपात प्रगट व्हावेच व त्या नराधमाचा नायनाट करावा असे मला मनापासून वाटते.

 

संपूर्ण घराचे घरपण तुझ्यामुळेच तर आहे. घरातील प्रत्येकाच्या आवडी निवडी तू जोपासते. घराची टापटीप, स्वच्छता, पै पाहुण्याचे स्वागत, सासू सासरे ,मूलबाळं सगळ्यांची देखरेख व काळजी तू घेत असते ते ही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता. तुला कुणाकडून काहीच अपेक्षा नसतात फक्त दोन शब्द प्रेमाचे तुला हवे असतात. ते नवऱ्याने अथवा सासू सासऱ्यांनी दिले तरी तुला ते पूरे असतात.

 

कुणी तरी म्हटलेच आहे की, “स्त्री ही क्षणिक काळाची पत्नी व अनंत काळाची माता” आणि ते तुझ्या बाबतीत अगदी खरं आहे. घरातल्या प्रत्येकाचे तू आईच्या मायेनेच करते.

 

तुझ्या मुलांवर तुझी अपार माया असते. त्या करता तू कोणते ही दिव्य करायला तत्पर असते. आदिमायेच्या ओढीने तू सर्वांचे भलं करण्यास झटत असते.

स्वतःचा संसार नीट साभांळून तू तुझ्या आई वडिलांच्या सुखाकरता त्यांचावर ही प्रेमाची छाया सतत देत असते. सासर, माहेर साभांळण्यासाठी तू तारेवरची कसरत करते. ह्या बाबतीत तुझं कौतुक करांव तितकं थोडंच.

एवढे घर दार, सासर माहेर व हल्ली तू मोठ मोठ्या पोस्तवर ऑफिसच्या जिम्मेदाऱ्या घेऊन तेथे ही काम नीट करते. खरंच प्रत्येक घरातील लोकांनी नवरात्रीत तुला स्त्री शक्तिचा मानाचा पुरस्कार द्यायलाच हवा.

हं आहेत हां , काही पुरूष असा सन्मान स्त्रियांचा करतात. माझ्या मते प्रत्येक स्त्रिचा असा सन्मान करावा आणि तिच्या कष्टांबद्दल थोढी कृतज्ञता व्यक्त करावी.

 

ग्रहिणी तुझा विजय असो. तुला नवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.

 

कळावे लोभ असावा, सैदव तुझा सन्मान आणि तुझ्याकडे आदरांने पाहणारी,

 

तुझी सखी,

 

शोभा वागळे

मुंबई.

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा