You are currently viewing बापू सत्याचा मार्ग कठीण

बापू सत्याचा मार्ग कठीण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चन्द्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बापू सत्याचा मार्ग कठीण* 

 

बापू

तुमच्या अहिंसेच्या मार्गावरून

चालणं आता कठीण झालंय

तुमच्या आमच्या आपल्या देशात

पावलोपावली साधुराम आढळतात

इथे शस्त्रधारी भित्रे कुत्रे

रोजच भेटतात भिडतात

सरसावलेत अहिंसेची हत्या करायला

स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी

तुमच्याच नावाचा आधार घेतात

वरून शुभ्र बगळे

आतून विचारातून काळवंडलेले कावळे

भ्रष्ट नीतीचे समाजकारण करतात

आणि दीनदुबळ्या जनतेला

छळतात रोज

 

बापू

इथे पुन्हा एका गांधीला

जन्म घ्यावा लागेल

आपल्याच हित शत्रुंचा

नतद्रष्ट व्यभिचारी भ्रष्टाचारी

हिंसाचारी अत्याचारींचा

अहिंसेच्या शस्त्रानेच

समूळ नायनाट करण्यासाठी….

 

बापू

इथे गांधीवाद अजूनही कुणालाच

पूर्णपणे समजलेला नाही

बुरशी लागत चालली आहे

आधुनिकतेच्या नावाखाली

त्यांच्या विचारधारेला….

 

बापू

तुम्हाला

तुमच्या अहिंसेच्या विचार धारेला

जगाने स्वीकारलं

पण….. पण….

दुःख एकच आहे

सलत राहील सतत..

आपल्यांनीच तुम्हाला संपवलं

आता तुमचा अहिंसेचा मार्गही

संपवू पहात आहे

हिंसेचा मार्ग अवलंबून…

बापू

इथे सत्याच्या मार्गावरुन चालणं

खुप कठीण असतं

हे सिद्ध झालंय….

हे सिद्ध झालंय….

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*( चांदवडकर ).धुळे.*

*7588318543*

प्रतिक्रिया व्यक्त करा