You are currently viewing गांधी

गांधी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गांधी*

 

किती अडवला, किती मारला, तरी कधी ना सरला गांधी

सत्य, अहिंसा, शांति, प्रितीच्या तत्वामधुनी ठसला गांधी

 

फार शोधली ग्रंथ, पुस्तके इतिहासाची पुन्हा पुन्हा ती

बदनामीच्या वादळातुनी साऱ्यांना मग पुरला गांधी

 

विचारधारा अनेक आल्या गोळाबारी अन क्रांतीच्या

“बंधुभाव ” च्या मंत्रा मधला साऱ्यांनी मग वरला गांधी

 

सत्याग्रह हे शस्त्र अनोखे साऱ्यांना ते कळून येता

मानवतेला साद घालुनी सर्व जगाने धरला गांधी

 

अजून येतो प्रत्यय त्यांच्या सांगितलेल्या उपदेशाचा

काळा पुढच्या विचारातुनी लख्ख पणे मग उरला गांधी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा