सावंतवाडी :
नवरात्र उत्सवानिमित्त सावंतवाडीत शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ४ ऑक्टोबरला वैश्यभवन सभागृहात सायंकाळी ५ ते ८ नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिला व मुलींसाठी गरबा, दांडिया, वेशभूषा तसेच लकी ड्रॉ, फनी गेम अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी व जास्तीत जास्त महिला, मुलींनी सहभाग दर्शवावा असे आवाहन शहर महिला आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.