You are currently viewing ६ ऑक्टोबर रोजी बार कौन्सिल अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा भव्य नागरी सत्कार

६ ऑक्टोबर रोजी बार कौन्सिल अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा भव्य नागरी सत्कार

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ॲड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल, ॲड.संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार हा कुडाळ तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक संस्थांच्या वतीने रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे भव्य सत्कार सोहळा होणार आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, तसेच  महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे जयंत जयभावे, उपाध्यक्ष सुदीप पासबोला, गजानन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला पहिल्यांदाच बहुमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमित सामंत, ॲड. अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, श्रीनिवास नाईक, विशाल देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, गजानन कांदळगावकर,संतोष शिरसाट, ॲड. आनंद गवंडे, ॲड. पै आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा