You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

**स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी :**

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती सांगितली. त्यामध्ये, महात्मा गांधीजींचे साधे राहणीमान, स्वावलंबन, त्यांची उच्च विचारसरणी या त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यात आले. तसेच इतरांना कोणताही उपदेश करताना त्याची सुरुवात प्रथम स्वतःपासून करावी ही त्यांनी दिलेली शिकवण विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. तर, शालेय सहा. शिक्षिका सौ. निधी सावंत यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सादर केली. यामध्ये, लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली घोषणा ‘ जय जवान जय किसान’ या घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. तसेच त्यांनी जनतेला दिलेली शिकवण म्हणजेच ‘ सर्वधर्म समभाव’ या मागील उद्देश माहितीद्वारे स्पष्ट करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून महात्मा गांधीजींचे ‘ रघुपती राघव राजाराम ‘ हे भजन म्हंटले. तसेच, स्काऊट गाईड अंतर्गत इयत्ता दुसरीतील कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छता हा उपक्रम राबविला. पुढील दहा दिवसांसाठी स्काऊट गाईडतर्फे आयोजित विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये, ‘ वैष्णव जन तो’ हे भजन शांतीसाठी पदयात्रा, बसस्टँड व देवलयांची स्वच्छता, गांधीदर्शन, वेशभूषा स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांना प्रशालेतील स्काऊट गाईड शिक्षिका सौ. सुषमा पालव यांनी मार्गदर्शन केले. तसेच, ‘ रघुपती राघव राजाराम’ , वैष्णव जन तो’ या गांधीच्या सर्वधर्म प्रार्थना, भजने का म्हटली जातात या मागचा उद्देश त्यांनी विद्यार्थांना समजावून सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. अशाप्रकारे, महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा