You are currently viewing बाहुली (शेल काव्य)

बाहुली (शेल काव्य)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाहुली* (शेल काव्य)

 

बाहुली माझी सुंदर

सुंदर गोजिरवाणी

उद्या सासरी जाताना

जाताना डोळा पाणी

 

माझ्या अंगणात कळी

कळी केव्हा हो फुलली

कैसे सरले हे दिन

दिन नाही समजली

 

कन्या परक्याचे धन

धन चोरून नेईल

राजकुमारासवे ती

ती हर्षित जाईल

 

संस्कारांच्या ती मुशीत

मुशीत आकारा आली

धुरा संसाराची आता

आता पेलाया निघाली

 

सासू श्वशूर हो तिचे

तिचे माय पिता आता

दीर नणंद लाडकी

लाडकी भगिनी भ्राता

 

लाभो सुखाची सावली

सावली पतीप्रेमाची

प्रेमळ संसारी तिला

तिला उणीव कशाची?

 

*अरूणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

०१/१०/२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा