You are currently viewing जपा …अक्षरांचे व्यक्तीमत्व …!!

जपा …अक्षरांचे व्यक्तीमत्व …!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जपा …अक्षरांचे व्यक्तीमत्व …!!*

 

अक्षरांनाही असत व्यक्तीमत्व

अवकाश व्यापून घेत

अज्ञानाचा अंधकार नको

अक्षरांची रचना चौकटीत…!

 

अक्षरचं विवेकी सत्वगुण

मुळाक्षरांनी माणसं जोडावी

सुलेखनात अमर्याद चेतना

शब्दांनी अधोरेखित करावी ..!

 

व्यक्तीमत्व आकृतीबंध अक्षरांच

सौंदर्य ओंकार आकाराच

शांती प्रकाश चेतनेत

अमर्याद अवकाश अक्षरांच…!

 

अक्षरांना अपशकुनाची भीती

अक्षरांना जपून वापरा

चित्रशुध्द सात्विक अक्षरांना

जमीनीचा स्पर्श करा..

 

शब्द व्हा!निरागस व्हा!अक्षर व्हा!

कडेवर तान्हुल्या अक्षरांना घ्या

चैतन्य बांधून रांगत जाईल बाळ

दृष्टीभेटीत झेपावेल.. कवटाळून घ्या

 

अक्षरांचं व्यक्तीमत्व जपा…

शब्द व्हा!निरागस व्हा!अक्षरं व्हा!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा