You are currently viewing श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई

श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई

*श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई*

*पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कार्य*

बांदा:-

येथील पानवळ येथे असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने मंदिरात जाण्या-येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. तसेच आजूबाजूचा परिसर हा जंगलमय असल्याने साप व इतर जंगली प्राण्यांचा देखील धोका वाढलेला होता. ही बाब लक्षात येताच पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सदर मंदिर व परिसराची साफसफाई करण्याची मोहीम आखली व आज श्रमदानाने सर्व मंदिर परिसरातील झाडेझुडपे हटवत परिसर मोकळा केला. त्यामुळे स्थानिक तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले व यावेळी सदर युवकांचे कौतुक देखील केले.
या श्रमदानाच्या कार्यात पानवळ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वयम वळंजू , ऋग्वेद कल्याणकर, जतीन देसाई ,अमोल सावंत,नारायण सावंत,ओंकार गवस यांनी भाग घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा