You are currently viewing थोडं मनातलं

थोडं मनातलं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडं मनातलं*

 

*******************

सध्या देवधर्माच्या वाटेवर अनेकांची पावले वळायला लागलीत अनेक तरुण तरुणी भक्तीभावाने पूजा अर्चा करू लागलेत.कारण देवपूजा करणे ही भारतीय संस्कृती आहे संस्कृती आणि परंपरेतून संस्कार घडवले जातात तेंव्हाच श्रध्दा माणसांच्या मनात प्रकट होते.म्हणून श्रध्देच्या भावनेतून आपण मंदीरात जातो नवस करतो कुळधर्म पुजा करतो.हे सारं देवावर श्रद्धा असते म्हणून होत असत.पुर्वीचे संत प्रपंच सोडून भक्तीमार्गाने अध्यात्मिक ज्ञानाचे प्रबोधन करत होते.पायपिट करून गावोगावी जाऊन भंजन किर्तन भागवत कथेच्या माध्यमातून लोकांना उपदेश दिले आहेत मिळेल तिथे खायचे नाही तर उपाशी राहून देवाच्या नामस्मरणात लिन होत असे.स्वतला संत समजून घेणारे सध्याचे संत बि एम डल्बू सारख्या महागड्या गाड्यामधून गावोगावी प्रवचन करतात.लाखो रूपये कथा सांगण्याचे घेतात.खर पाहता माणसाने श्रद्धाळू असावं पण त्या श्रध्देचा विपर्यास व्हायला नको.भावनेच्या भरात श्रध्देच अंधश्रद्धेत रूपांतरीत झाली की माणूस भरकटला जातो.म्हटल तर वाया जातो.माणूस श्रेध्देवरच जगतो आहे देव आहे ही भीती माणसाला योग्य दिशा दाखवते देवावर श्रध्दा आहे म्हणून माणसाची वाट चुकत नाही.आता लोकांना भक्तीमार्गाला लावणारे काही स्वयंघोषित संत आहे की त्यांचे नको ते किस्से उघड झाले आहेत,नाही ते उद्योग करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करून त्यानां नादी लावलय अशा स्वयंभू संतावर भोळ्या माणसांची जास्त श्रध्दा असते. पण इतकेही माणसाने भाऊक होऊ नये की अंधश्रद्धेच्या नांदी लागून भलत्याच्या पठीमागे लागावं.आणि एक गोष्टी खरी आहे की बुवाबाजी करून लोकांच्या जीवावर भोंदू बाबा मोठे होतात त्यांना पायघड्या घालतो जणूकाही तो देवच आहे असं समजून त्याला साष्टांग दंडवत घालतो पण घरी आई वडिलांचा पाया कधी पडत नाही.अशा स्वयंघोषित संतांना मोठ मोठ्या देणग्या देतील दान करतील पण एखाद्या गरजवंताला कोणाकडूनही मदत होत नाही. ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांना वृध्दाश्रम पाठवले ते ही देवापेक्षा काही कमी नाही त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला तर देवाची पुजा केल्या सारखं होईल पण असा विचार कोणाच्याही मनात येत नाही.काय आहे की श्रध्दा ही माणसाची मोठी ताकद झाली आहे.आणि माणसाचा त्यावरच जास्त विश्वास आहे.आणि हिच भावनीकता ओळखून स्वत:घ्या तिजोऱ्या भरण्यासाठी पोवलोगणीक संत महंत निर्माण झाले आहेत.कारण शैक्षणिकदृष्ट्या प्रगतदेशात शिकूनही बेरोजगारी एव्हढी वाढली की कुठे तरी लवकरात लवकर नौकरी मिळावी म्हणून परमेश्वरा जवळ प्रार्थना करावी लागते मंदिरात जाऊन माथा टेकवावा लागतो.कारण माणसची देवावर श्रद्धा असते म्हणून.देवांवरची श्रध्दा त्याची उर्जा असते श्रध्देची ऊर्जा घेऊनच आजच्या काळातला प्रत्येक माणूस जगतोयं काय.झुकाल तसे झुकवले जाणार हे या भोंदू भामट्यांन कळून चुकले म्हणून माणसांची अचुक नाडी त्यांनी पकडून ठेवलीय.माणूस श्रध्देच्या भावनेतून फसवला जातो.पण अशा भोंदू बाबांच ऐकल्याने जर माणसाची प्रगती होत असेल तर ते स्वतःच का नाही कल्याण करून घेत नाही.का दुसऱ्यांना उपदेश द्यायचा.पण माणूस हा स्वतःच न ऐकता दुसऱ्याच जास्त ऐकतो आणि तिथेच फसतो.स्वताचा विश्वास हे आपल्या प्रगतीच उगमस्थान आहे.स्वतावर विश्वास आणि देवावर श्रद्धा असली की आयुष्य काहीच अडचण येत नाही.जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा परमेश्वर तुमच्या मदतीला हजर रहून तुमचे संकट दुर करतो.म्हणून आपणच आपला मार्ग निवडून आपणच आपल्या आयुष्याशाचे शिल्पकार व्हावे.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा