सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 12 एअर कंडिशन मशीन वेगवेगळ्या विभागामध्ये बसवण्याची काम सुरू
जीवन रक्षा वैदिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली माहिती
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे बरेच महिने डायलिसिस सेंटर त्याचप्रमाणे आयसीयू कक्ष ऑपरेशन थिएटर येथे एअर कंडीशन मशनरी बरेच महिने बंद असल्याने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी यांनी अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे तसेच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील तसेच जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी सुबोध इंगळे यांना निवेदन देऊन व दूरध्वनी करून त्यांच्याशी मागणी करून रुग्णांना एअर कंडीशन मशीन नादुरुस्त असल्याने त्यांना त्रास होतो त्याचप्रमाणे डायलिसिस सारखी मशिनरी बंद पडतात याची सर्व माहिती त्यांना देऊन लगेच बांधकाम विभागामार्फत मंजुरी घेऊन ही एअर कंडिशन मशीन बसवण्यात कंपनीमार्फत आली आहे.
साधारण 12 एअर कंडिशन मशीन वेगवेगळ्या विभागामध्ये बसवण्याची काम सुरू झाले असून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसूरकर सावंतवाडी यांनी समाधान व्यक्त करून सिविल सर्जन श्रीपाद पाटील जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी सुबोध इंगळे तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर येवाळे यांचे आभार मसूरकर यांनी मांडले आहे चांगली रुग्णांना सेवा मिळावी यासाठी जीवन रक्षा वैदिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर गेले 24 वर्षे नेहमीच रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत