You are currently viewing विशाल परब हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते

विशाल परब हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते

समाजाप्रती सेवाभावी वृत्ती ठेवून विशाल परब यांनी घेतलेल्या रुग्णवाहिका लोकार्पणाचा उपक्रम कौतुकास्पद; पालकमंत्री रवींद्र चव्हाण

 

सावंतवाडी :

विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊल अभिमानास्पद आहे. त्याचा फायदा अनेक गरजूंना होईल. त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरू ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. विशाल परब हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले आपले काम असेच सुरू ठेवावे निश्चितच त्यांना त्याचा भविष्यात फायदा होईल असे पालकमंत्री म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सहा रुग्णवाहिका वाटप करण्यात आल्या या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, गोव्याचे माजी आमदार जीत आरोलकर, विशाल परब, सौ. वेदिका परब, मनोज नाईक, रवी मडगावकर, दिलीप भालेकर, सुधीर आरीवडेकर, लवू भिंगारे, केतन आजगावकर दिपाली भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री चव्हाण म्हणाले, या ठिकाणी समाजाप्रती सेवाभावी वृत्ती ठेवून विशाल परब यांनी घेतलेल्या रुग्णवाहिका लोकार्पणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे त्यांच्या मतदारसंघातील गरजू लोकांना फायदा होणार आहे. अत्यावश्यक प्रसंगी तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निश्चितच असे लोकाभिमुख उपक्रम राबवणे गरजेचे आहे. लोकांची सेवा करून समाजकारणातून त्यांनी आपली वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवावी.

पालकमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला चालना दिली. टेली मेडिसिनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केल. सर्वसामान्य तळागाळातील लोकांना आरोग्य सुविधा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले. अशाच प्रकारे सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून विशाल परबांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे कौतुकास्पद आहे सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ती कामे करावे. त्यांच्या पाठीशी आमचे आशीर्वाद कायम आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा