ठाणे, दि. २७ गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी ठाणे येथे कोकण विभागीय एक दिवसीय गझल संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य तर या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे उपस्थित राहतील.
ज्येष्ठ गझलकारा उर्मिला बांदिवडेकर या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत. तर नामांकित गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार नामांकित गझलकार वैभव जोशी यांच्या ‘काळ सरकत राहिला’ या गझलसंग्रहाला जाहीर झाला आहे. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया हळवे करतील.
दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचे गझल मुशायरे रंगतील. या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद शिवाजी देवरे, साबीर सोलापुरी, वैशाली शेंबेकर, रत्नमाला शिंदे व मानसी जोशी हे भूषवतील. तर सूत्रसंचालन ज्योत्सना राजपूत, सुनेत्रा जोशी, मुग्धा कुळये, डॉ. सुजाता मराठे व डॉ. मनोज वराडे करतील.
हे संमेलन एम. एच. हायस्कूल, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. गझल रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, ठाणे जिल्हाध्यक्षा मानसी जोशी, कोकण विभाग अध्यक्ष डॉ मनोज वराडे आणि ठाणे जिल्हा व कोकण विभाग कार्यकारिणीने केले आहे.
_______________________
भरत माळी
प्रसिद्धी प्रमुख
गझल मंथन साहित्य संस्था
मो. 9420168806