You are currently viewing ना. रवींद्र चव्हाण विशाल परब यांच्या निवासस्थानी 

ना. रवींद्र चव्हाण विशाल परब यांच्या निवासस्थानी 

श्री स्वामी समर्थ मंदिरात घेतले दर्शन..

सावंतवाडी :

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले.

सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, ॲड. अनिल निरवडेकर, प्रभाकर परब, रवी परब उपस्थित होते. परब कुटुंबीयांच्या वतीने श्री चव्हाण यांचा विशाल परब, वेदिका परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा