You are currently viewing परतीचा पाऊस…(वऱ्हाडी कविता)

परतीचा पाऊस…(वऱ्हाडी कविता)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*परतीचा पाऊस…(वऱ्हाडी कविता)*

 

नभी वाजवोते ढोल

परतीत ह्या पाऊस…

जशी अधुरी आपली

पूरी करतेया हौस…।। १ ।।

 

कसा नियतीचा फेरा

फिरे अथीसा क्षणात…

रानं फुलोता पाऊस

जाते काटा उगवोत…।। २ ।।

 

आले सोंगनीले मूग

उडीद नं सोयाबीन…

बळीराजाचं सपान

पावसात छिन्नभिन्न…।। ३ ।।

 

आला दसरा सोमोर

तेच्या पाठी दीपावली…

कसा पाऊस बाजिंदा!

ओढे रेघोट्या कपाली…।। ४ ।।

 

अगा बापा मेघराजा

घेतं अशी का गा मजा…?

बरसून अवकानी

नोको घेऊ जीव राजा…।। ५ ।।

 

होऊ दे रे आबादानी

बळी झाला वेडापिसा…

तोंडी आला हुया घास

नोको पळवू गा असा…।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा