You are currently viewing नटश्रेष्ठ अभिनेता आयतं पोयतं सख्यानं’ आदरणीय प्रविण माळी सरजी यांच्या सहवासातील एक आदर्श भेट

नटश्रेष्ठ अभिनेता आयतं पोयतं सख्यानं’ आदरणीय प्रविण माळी सरजी यांच्या सहवासातील एक आदर्श भेट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*नटश्रेष्ठ अभिनेता आयतं पोयतं सख्यानं’ आदरणीय प्रविण माळी सरजी यांच्या सहवासातील एक आदर्श भेट.*

 

माणसांच्या गर्दीत काही अशी विशेष माणसं असतात की ते नकळतपणे आपल्या आयुष्याशी जोडले जातात नव्हे तर ह्रुदयात घर करून राहतात. नेहमीच आपल्याला हवीहवीशी वाटता त्या़ंच्या सहवासातला प्रत्येक क्षण नवीन काहीतरी शिकवत असतो. त्यांचा अनुभव प्रेरणादायी असतो. म्हणून अशी माणसं पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटतात. अशा खास व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसांना ना पैशाच्या लोभ असतो ना यशाची, ना प्रसिद्धीची लालसा असते. जन्माला आलोय ना मगं जेव्हढ चांगलं काम करता येईल तेव्हढ चांगलं करत रहायचं एव्हढाच एक प्रामाणिक हेतू घेऊन ते जगत असतात. पद, प्रतिष्ठा पैसा प्रसिद्धीची हवा डोक्यात जावू न देता पाय कायम जमीनिवरच राहू देतात. मग अशा खास व्यक्तींच्या यशाचा शिखर बघायला अभिमानाने मान उंच होते आणि आपसूकच ते आपल्या ह्रुदयात जागा करून घेतात. साहित्य क्षेत्रात वावरताना अशा खूप चांगल्या माणसांशी मी जोडला गेलोय जे माझे कायमचे झाले. असे एक खान्देशातले खास व्यक्तीमत्व जे आई सरस्वती चे पुत्र व अहिराणीचे पुजक आहेत जे संपूर्ण साहित्य,सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात आदर्श आहेतं.खरतर ते माझ्यासाठी आधीपासूनच आदर्श आहेत पुरस्कार तर त्यांना नंतर मिळाला असे माझे मित्र जे माझ्या ह्रुदयात आहेत ते म्हणजे आदरणीय ‘प्रविण माळी’ सर त्यांच्या ‘आयतं पोयतं सख्यानं’ संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. सामाजीक,सांस्कृतिक क्षेत्रातच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात विचारा पलीकडेचे उल्लेखनीय कार्य करून समाजामध्ये त्यांनी आगळावेगळा आदर्श निर्माण केला म्हणून ते खऱ्याअर्थाने आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरलेत.आणि त्या आदर्श पुरस्कारालाही प्रविण सरच हवे होते म्हणून त्यांचं कार्य एक आगळ्यावेगळ्या यशाच्या उंच शिखरांवर विराजमान झाले अशा नटश्रेष्ठ महामहींच्या यशाच्या उंचीला मान वर करून बघताना मला अभिमान वाटतो. अशा गोड मितभाषी मनमिळाऊ प्रविण सरांचा सन्मान करतांना मला खूप खूप आनंद झाला. आज एक छोटीशी भेट त्यांच्या घरी जाऊन सन्मार्थाने दिली आणि तेव्हढ्याच तळमळीने त्यांनी स्विकारली.भेट वस्तू देणं म्हत्वाची नव्हते तर त्या़च्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होणे हे खूप जास्त महत्वाच होत म्हणून माझी पावलं त्यांच्या घराकडे वळलीत. खूपच गप्पा झाल्यात गप्पांच्या ओघात खूप भावनिक विषयावर चर्चा झाली आणि त्यांनीं एकच गुरूमंत्र दिला की.वेदना कितीही असल्या तरी त्यांचा विचार न करता चेहऱ्यावर वेदनेचे भाव न आणता फाक्त चेहऱ्यावर कायम हसु राहु द्यायाचं.चेहऱ्या हसरा राहीला म्हणजे आपल्या वेदना कोणाला कळत नाही किंबहुना वेदना कोणालाही दिसू न देता पुढे मार्गक्रमण होत रहायचं.आपल्या अवतीभवती माणसं कशीही असली तरी आपण आपलं कार्य करत रहायचं.स्वत:हून‌ मोठ होण्यापेक्षा दुसऱ्यांनी मोठ केल्याच्या आनंद कधीचं चेहऱ्यावरच हसु जाऊ देत नाही.आजचा दिवस माझ्यासाठी खूपच आठवणीच्या कुपीत जपून ठेवणारा आहे.कारण कलेचे उपासक, कला सारथी नटश्रेष्ठ,सरस्वती पुत्राचा सन्मान करतांना खऱ्याअर्थाने मी मोठा झालो.या सुदामाची भेट स्विकारून त्यांनी माझा सन्मान करून त्यांनी मला श्रीकृष्णाची मुर्ती भेट दिली.अर्थातच श्रीकृष्णाच्या रूपाने प्रविण सर जी माझ्या घरी आल्याचा आनंदात मी गहिवरून आणि भाराऊन गेलो. परमेश्वर त्यांच्या यशाचा शिखर उत्तरोत्तर वाढत राहो उत्तम आरोग्य आणि उदंड यश मिळत राहो हीच परमेश्वराला प्रार्थना.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 

एक स्नेह सखा

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

प्रतिक्रिया व्यक्त करा