You are currently viewing रुणझुण

रुणझुण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”रुणझुण”*

 

भ्रमररुपी मना चंचलता दे सोडून

भक्ती रसाचा घे आस्वाद स्थिर कर मनIIधृII

 

भ्रमर चाखतो फुलांतून मधुर गंध मध

रुणुझुणु ध्वनी करीत फिरतो फुलांतुनII1II

 

पाळणी खेळत्या गोजिऱ्याचे वाजती नुपूर

इवल्याशा पायातील रूणझुणतो नादII2II

 

रुणझुणत्या पाखरा स्त्री सांगे जारे माहेरा

सर्वांना सांग मी रमले सासरी आनंदातII3II

 

रामदासांनी केले आहे गणरायाचे वर्णन

रुणझुणती नुपुरे करिती मंजुळ नादII4II

 

गोकुळात गोपि तन्मय झाल्या रासक्रीडेंत

मेखला पैंजणे होतो वेणूनाद रूणझुणII5II

 

माऊली सांगी मनुष्या लाभले हरिचरण

निश्चळ मने करावी भक्ती होईल कल्याणII6II

 

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा