*कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती*
*२.५ कोटी रु. गेले पाण्यात;युवासेनेने आंदोलन करून केला पर्दाफाश*
*गळती लागलेल्या ठिकाणी बांधले प्लास्टिक कापड*
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २.५ कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचे उद्घाटन केले. मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभिकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरु असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. भाजप सरकार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला असून तो आता उघड होत असल्याचा आरोप करत आज युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. तसेच गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी शिंदे-फडणवीस सरकार हाय हाय ! भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो! भ्रष्टाचारी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय! अशा घोषणा देऊन युवासेनेने तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे,सागर भोगटे,युवासेना उपतालुकासंघटक दीपेश कदम,युवासेना तालुका चिटणीस केतन शिरोडकर,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे,युवासेना विभाग प्रमुख मितेश वालावलकर,प्रथमेश राणे, गुरु गडकर,प्रसाद गावडे, रामा कांबळी, राहुल नाईक, भूषण गावडे,संदेश सावंत,अजित मार्गी आदि उपस्थित होते.