*लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवणच्या जनतेने नाकारल्यामुळे बिथरलेल्या आमदार वैभव नाईक यांचा खोटे प्रवेश घेऊन आभासी वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न:- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
गेली दहा वर्षे जनतेची कामे करण्यास सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या उबाठा शिवसेनेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने मनसेची एवढी धास्ती घेतलीय की आमदार वैभव नाईक यांना आपली ढासळलेली पत राखण्यासाठी मनसेमध्ये गेली अनेक वर्षे कधीही न पाहिलेल्या आपल्याच शिवसैनीकांना मनसेचे कार्यकर्ते दाखवून खोटे प्रवेश घेण्याची वेळ आलेली आहे. कुडाळ मालवणच्या जनतेने तब्बल दोन वेळा आमदारकीची संधी देऊन सुद्धा मतदारसंघाचा ठोस विकास करण्यास अपयशी ठरलेल्या आमदार वैभव नाईकांना गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी साफ नाकारल्याले. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होणार म्हणून यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाकारणाऱ्या वैभव नाईकांना आता मनसेच्या खोट्या कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवून वातावरण आपल्या बाजूने असल्याचे दाखवण्याचा ढोंगीपणा आणण्याची वेळ आली आहे.
यापुढे तेरसेबांबार्डे येथील फसव्या प्रवेशा प्रमाणे भविष्यात कितीही फसवे प्रवेश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरीही यावेळी कुडाळ मालवणची जनता आमदार वैभव नाईक यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही अशी टीका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍
*जाहिरात लिंक*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*