You are currently viewing २८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धा

२८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धा

बांदा :

शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाचवी ते सातवीतील विद्याथ्यर्थ्यांसाठी चित्रकला व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा होणार आहे. चित्रकला स्पर्धा पाचवी ते सातवीसाठी ‘सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणारी मुले’ हा विषय ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे. रंग, साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यायचे आहे. रंगभरण स्पर्धा पहिली ते चौथी या गटात होणार असून विद्यार्थ्यांना रंगवण्यासाठी चित्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रंग, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत-जास्त मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, लाड मित्रमंडळाचे संदीप नार्वेकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा