*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कललं ऊन*
कललं ऊन
परतली पाखरं
दूरवरून………
कललं ऊन
धुसरलं अंबर
गोठी हंबर……
कललं ऊन
शाळाआता सुटली
दारी माऊली….…
कलले ऊन
सावळले आभाळ
दिशांमधून……
सोन पावलं
संध्येची ती चाहूल
ऊन कललं…….
ऊन कलता
दरवळ गंधाचा
जाईजुईचा…..
कलता ऊन
निरोप दिवसाला
सांज भेटीला……!!
✨✨⭐✨✨⭐✨✨
अरुणा दुद्दलवार @✍️