*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवीवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🎹🎹माझ्यावरती रुसतांना तू🎹🎹*
खूप प्रेम केले तू मजवर
विचार केला नव्हता !!
माझ्यावरती रुसतांना तू
विचार केला नव्हता ।।धृ।।
रुसलीस का ना थेंब दवावर
पानावरच्या छोट्या
रुसलीस का ना शिंपल्यातल्या
मोत्यावरती मोठ्या
तुझे कधीही होणारच ना
विचार शिवला होता ? ।।१।।
रुसलीस का ना किरणांवरती
पर्णफटीतुन येत्या
रुसलीस का ना देवाश्मावर
सर्वांना आवडत्या
अवखळ तुझिया मनात वारे
असेच का शिरता ?।।२।।
रुसलीस का ना ध्रुव तार्यांवर
उत्तर दक्षिणच्या
रुसलीस का ना त्या सूर्यावर
तांबुस प्राचीच्या
चिंतन पडले कमी तुझे वा
माझी कमतरता ? ।।३।।
रुसलीस का ना त्या लाव्ह्यावर
वसुधा गर्भीच्या
रुसलीस का ना त्याच ऋषिंवर
मानतडागीच्या
माझे मीपण उगा हरवले
तुझ्या मनी भरता ।।४।।
एक कळीचे उमलुन सुंदर
कुसुम जाहले होते
सुगंध त्याचा चराचरातुन
तेच चर्चिले होते
त्या सुमनाच्या मनी समर्पण
हा सद्भावच नव्हता ।।५।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नाशिक ४२२०११
मो ९८२३२१९५५०