भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते मालवण जेटी येथे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन
विकासकामांसाठी १ कोटी ३४ लाख निधी मंजूर
मालवण :
मालवण शहर मुख्य रस्ता ते बंदर जेटीपर्यंतच्या पोचरस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे कामाचा उद्घाटन सोहळा सोमवारी मालवण बंदर जेटी येथे भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या रुंदीकरण मजबुतीकरण कामासाठी १ कोटी ३४ लाख १७ हजार रुपयांचा निधी खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून भाजपा युती शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
याठिकाणी मोठया संख्येने पर्यटक येत असतात. येथील रस्ता खड्डेमय झाल्यामुळे समस्या निर्माण होत होत्या. हे रस्ताकाम होत असलेबाबत व्यवसायिक व नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, जगदीश गांवकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, जेष्ठ पदाधिकारी अनिल मोंडकर, नारायण धुरी, महिला शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर, भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजु बिडये, नंदू देसाई, मिलिंद झाड, दिलीप आचरेकर, जॉन फर्नांडिस, ओम तोडणकर, निषय पालेकर, शुभम लुडबे, शंकर मोरजकर, कमलाकर कोचरेकर, संदीप भोजणे, नारायण लुडबे, यशवंत मालंडकर यांसह अन्य पदाधिकारी, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.