*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जाहीर सत्य….*
उधळेल पुष्प कोणी
म्हणतो चुकून नाही…
काट्यांत सम गुलाबा
घ्यावे फुलून काही…
बोलांवरी कुणाच्या
विश्वास ठेवता तर…
उरले न मोल शब्दा
घ्यावे स्मरून काही…
आशेवरी जिवाचे
चलणार जर इथे ना…
थोडेतरी मनाचे
घ्यावे करून काही…
पुरणार जर कुणी ना
आयुष्यभर कुणाला…
पायावरी स्वतःच्या
घ्यावे चलून काही…
येणार एकटा जिव
जाणार एकटाची…
जाहीर सत्य शाश्वत
घ्यावे कळून काही…
✍️शशांक दिनकरराव देशमुख©®
चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५