*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”प्रतीक“*
प्रतीक संस्कृती विचारांचे आदर्श लक्षण
प्राचीन संस्कृती सर्वांसाठी अक्षय देणंIIधृII
संस्कृती विचार जीवन प्रणालीचे मिश्रण
शास्त्रकारांनी उत्सव निर्मिले ऋतुप्रमाणं
आनंदोत्सवात आचाराचे करावे पालनII1II
सर्व उत्सव अन्न वस्त्र उचीत ऋतु प्रमाणं
पूर्वजांनी केलेत संस्कार विज्ञान नियोजन
सर्व कार्याला आधार आहे विज्ञानाधिष्ठितII2II
शरीर आरोग्य जपलेले आहे दक्षतेनं
सांभाळले आहे पंचमहाभूत पर्यावरण
प्रतीक आहे वैभव विज्ञान मांगल्याचे चिन्हII3II
सकारात्मक सहज प्रवृत्ती आहे समाविष्ट
प्रतीक परिस्थिती प्रसंगाचे घडवे दर्शन
होई समाज विकास एकसंघ संपन्न उन्नतII4II
चौदा विद्या चौसष्ट कला प्रतीक गजानन
बासरी आहे श्रीकृष्ण प्रेमाचे प्रतीक ज्ञात
सरस्वती विद्या प्रतीक रम्य शुभंकर द्योतII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.