*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी वसुंधरा*
जसा चितारतो चित्रात मला
नेत्रात साठवून चित्रकार
तसाच
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यातील
शब्दसुमने वेचून
तू लिही कविता
माझ्या निर्मळ लावण्यरूपी
सौंदर्यावर…..
फुलवीन मी माझे रूप
जलद भरून आलेल्या
वरूण धारांनी न्हाऊन घेतल्यावर
माझ्या मुखकमलावर विराजमान
दलकमलांवर….
नयनसुखात चिंब भिजवणाऱ्या
आरसपाणी नेत्र तळ्यांवर….
सळसळत्या जलधारातून
ओघळणाऱ्या जलबिंदू सम
पानांवर पडलेल्या दवबिंदूंवर ….
विविधरंगी पुष्पसुमनांनी
तरू शिखरावर माळलेल्या वेणीवर…..
हिरव्या जरीकाठी बुट्टेदार
नेसलेल्या शालूवर….
सोनेरी किरणानी लकाकणाऱ्या
सुवर्ण कांतीवर
आणि
मावळतीला क्षितीज शिखरांवर विराजमान सुर्यरूपी
शिरोमणी मुकूटावर…
तू लिही कविता
माझ्या सौंदर्यावर
फुलवीन मी माझे रूप
मी अनभिषिक्त
सौंदर्य सम्राज्ञी
मी वसुंधरा…..
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
8208667477.