*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तर्पण*
भिंतीवरती जे आता बसले
ते आई बाबा मनात असती
अन किती सुहृदही
नसले
त्यांच्या स्मृती ओठी येती…. १
ऋण पुसणे अशक्य
जन्मदेचे
केले, नच केले, श्राद्ध
महालयी
पाहूया तळे उपसून आठवांचे
केले कर्तव्य तिच्या
उतारवयी?…. २
आशा पित्यास होती
प्रेमाची
अन घरातील एकीची
अपेक्षा
राख बूज भगिनींच्या
मायेची
नि केल्या संस्काराची रक्षा…. ३
जरी त्रासलो संसार करता
नच संपे मागण्याही
अपत्यांच्या
नको होऊ वृद्धासाठी
कोता
आहे वाटा त्यांच तव चालायच्या…. ४
वाटा मुक्तीच्या कुणी
पहिल्या!
का पिंडास काकस्पर्श
मोलाचा ?
पितृशाप कल्पना या
ऐकील्या
तर्पणी भाव असावा
कृतज्ञतेचा…. ५
@अंजना कर्णिक