You are currently viewing कन्या माझ्या

कन्या माझ्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित जागतिक कन्या दिनानिमित्त अप्रतिम काव्यरचना*

 

*कन्या माझ्या*

 

कन्या माझ्या

गुणांची आहे खाण

मला अभिमान

कर्तृत्वाचा!!

 

परिस्थितीचा अंदाज

लगेच घेतात मुली

प्रेमाची सावली

मातृत्व!!

 

जिद्द मेहनत

उण्या कुठे नसती

खेचून आणती

सुयश!!

 

शिदोरी संस्कारांची

घेऊन जाती सासरी

सांभाळती सारी

नातीगोती!!

 

कर्तव्यात परायण

सदैव साथ पतीची

संसारी सुखदुःखाची

पाठशिवणी!!

 

भावनिक आधार

अन् ममतेची सावली

माहेरी गावली

निरंतर!!

 

आजच्या कन्या

करुनी संकटांवर मात

वाट चोखाळतात

यशस्वीपणे!!

 

सूनही येता

वात्सल्य मुलीचे द्यावे

आई व्हावे

सर्वार्थाने!!🌷

 

………..🌷🌷🌷……..

अरूणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा