You are currently viewing थोडं मनातलं

थोडं मनातलं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडं मनातलं*

***************

आयुष्य खूप सुंदर आहे असं नेहमीच म्हणतो आणि वाचतो ही.पण अशी फार कमी माणसं आहेत की ते त्यांच आयुष्य खऱ्याअर्थाने जगतात आणि सुदंर करतात.चेहरा सुदंर नसला तरी चालेल पण माणसाचं कर्तृत्व आणि नेतृत्व सुंदर असलं की त्याला कसल्याच मेकअपची गरज पडत नाही.अणि अशा या सुरेख सुंदर आयुष्यातील वाटाही तितक्याच खडतर असतात म्हणून जगणं खरच अवघड आहे अस म्हटलं जातं. वाटा खडतर असु नाहीतर अवघड असु दे अनेक खडतर वाटा माणसांना पायदळी तुडवून पुढे जावे लागते. तेव्हा कुठे एक वाट प्रगतीची समृद्धीची ऐश्वर्याची सापडे तरी ही कष्टाने मिळवलेल्या यशाच्या कुठल्यातरी वळणावर मागे पाय खेचणारे किंबहूना रस्ता अडवणारे काही माणसं असतातच काय असतं कष्टाने मिळवलेली समृद्धी कुणाला बघवत नाही.त्यातही काही शंखेखोर माणसं काहीना काही काड्या कोरत असतात.सगळीच माणसं काही चुकीच्या मार्गाने श्रीमंत होत नाही.जे कष्टाला महत्त्व देतात अशा माणसांच्या वाटेला सुख,समृद्धी स्वतः हून धावून येते.छोट्याशा आयुष्यात समाधानी असणं खूप गरजेचं असतं‌. आहे त्यांतच सुख असतं फक्त ते स्विकाराव लागतं.ज्याने आहे ती परिस्थिती स्विकारली तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत नाही.आता तर आनंदीत रहाण्यासाठी हास्य क्लब सुरू झाली आहेत.रोज सकाळी जायचं आणि बळजबरीने हसायचं अशाने आनंद मिळत नाही.खोटे समाधान खोटा आनंद माणसाला कमकुवत करतो.स्वत:ला बळकट करण्यासाठी थोडसं मनातलं दुःख कुठेतरी मोकळ करून जे काही आपल्याला चांगलं करता येईल यातच खरा आनंद आहे खरे सुख आहे

खऱ्याअर्थाने जगणं आहे.प्रत्येकाला वाटतं की जन्माला आलोय तर काही तरी चांगल करावं म्हणजे जन्म आणि जगणं सार्थकी लागले. तेव्हा आपल्या ताटातला एक घास जरी दुसऱ्यांच्या पोटात गेला तरी त्याचासारखा आनंद दुसरा नाही.सध्या अनेक शहरांमध्ये वृध्दाश्रम सुरू झाली आहेत. की तिथे सदन कुटुंबातील,ज्यांची मुले मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत अशा मुलांचे आईवडील त्या वृध्दाश्रमात राहतात.त्यांच्या मुलांनी त्यांचं जगणं थांबवून जिवंतपणी त्यांना मरण यातना दिल्यात.अरे ज्यांचं जगणं सरत्या आयुष्याच्या उंबरठ्यावर येऊन उभं आहे त्या आईवडीलांना सांभाळायला मुलांना जड जातय. याच्यासारख दुःख नाही.अशा वृद्धांची अश्रू पुसायला आपला एक हात जरी पुढे सरसावला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना आपल्यालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.जगात अशी खूप दानशूर माणसं आहेत की त्यांच्या हातून रोज काहींना काही चांगल काम होत असतं अनेकांना त्यांच्याकडून मदत होत असतें अनेक रडक्या चेहऱ्यावर ते हसू देत असतात, त्यांची अश्रू पुसत असतात.अशा माणसांना पाहून आपल्याही हातूनही असं काही झालं तर आपण जगलो आणि जिंकलो समजा.

 

*संजय धनगव्हाळ*

*अर्थात कुसुमाई*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा