त्या आंदोलनाचा शिवसेना (उबाठा ) पक्षाशी संबंध नाही – शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी
शिवसेना कायम स्थानिकांसोबतच राहणार*
दोडामार्ग
सासोली येथील काही ग्रामस्थ व ओरिजिन कंपनी यांचे वाद गेली कित्येक दिवस चालू आहेत, सदर विषयात कायमच ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहिला आहे. त्यांच्यामध्ये काही ग्रामस्थांचे जे विषय वादाचे होते तेही मिटवण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत झाला आहे. असे असताना सदर विषयात भारतीय जनता पार्टीचे नेते राजन तेली यांनी भाग घेतल्याने त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ने आपला सहभाग कमी केला होता. अशातच स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही लक्ष घातले, त्यामुळे सदर विषयात आम्ही गप्प आहोत असे असतानाही संदेश पारकर यांच्याकडून आंदोलन केले जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे मात्र या आंदोलनाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टकेले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, काहीजण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यावरती नाहक आरोप करत आहेत, मात्र शिवसेनेचा सासोली येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणात एकही पदाधिकारी नव्हता आणि नाही. प्रत्यक्षात सासोलीतील ४०० एकर पेक्षा जास्त जमीन कोणी विकली? खरेदीदारांना घेऊन ग्रामस्थांपर्यंत कोण आले? हे सर्वांना ज्ञात आहे, असे असताना ज्यांचा सावंतवाडी विधासभा मतदारसंघ व येथील संघटनेशी काही संबंध नाही अशी मंडळी शिवसेनेच्या वतीने आंदोलन घोषित करत आहेत हे पूर्णतः चुकीचे असून या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचा काहीही संबंध येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नेहमी सासोली ग्रामस्थांच्या बाजूने होते आणि आहेत तसेच याही पुढे राहतील. येथील ग्रामस्थांचा प्रश्न मिटला पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही ठाम असू, मात्र संघटनेच्या जीवावर कोणी राजकारण करू पाहत असेल तर या विषयात संघटना त्याला कधीही थारा देणार नाही, म्हणूनच आम्ही आमची भूमिका जाहीर करताना संदेश पारकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नसल्याचे बाबुराव धुरी म्हणाले.
तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आमचे जिल्हाप्रमुख राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाप्रमुख या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सदर आंदोलनाला पाठिंबा दिला होता मात्र त्यांची दिशाभूल करून त्यांना माहिती देण्यात आली होती त्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा नसेल असेही शेवटी बाबूराव धुरी यांनी स्पष्ट केले.