You are currently viewing पसा-याविना! कसा जगू मी…!!

पसा-याविना! कसा जगू मी…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पसा-याविना! कसा जगू मी…!!*

 

या पसा-याविना कसा जगू मी ?

मनांतून तो !कसा हद्दपार करू मी ?

 

अडकलेले जीव

आठवणीतून कसे फेकू मी ..

आयुष्याशी चिटकलेला

एक कोपरा कसा पुसू मी ..

 

पसा-यात सारचं मौल्यवान

कसे निवडू मी ..

कांही निसटून गेलेत

कसे त्यांना आता बोलावू मी..

 

फोटो,पुस्तके,बक्षिसे,जुन्या वस्तू

कसे त्यांना दूर लोटू मी

इथपर्यंतच जगणं माझं

कसे भंगारात देऊ मी …!

 

माझ्या ओळखीच्या खुणा.. या

कश्या आता मिटवू मी ?

काही चमकल्या,काही विझल्या

कश्या त्या आता लपवू मी ?

 

या पसा-याविना !कसा जगू मी

ह्दयातून तो कसा हद्दपार करू मी ?

सलगीशी लगट मी जिव्हाळ्याने केली

आसक्तीच्या कह्यातून कसा बाहेर येऊ मी……..कसा जगू मी..!!

पसा-याविना या..कसा जगू मी..!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा