आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा फायदा घ्या – मंत्री दीपक केसरकर:
जिल्ह्यात तीन निवासी केंद्र शाळा तर एक हुशार मुलांसाठी शाळा होणार..
कुडाळ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्यातल्या सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाने जर्मनीशी केलेल्या कराराप्रमाणे राज्यभरातून एक लाख कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यंना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातून २०० विद्यार्थी तर राज्यातून पहिल्या टप्प्यात दहा हजार तरुण जर्मनीत रोजगारासाठी जाणार आहेत, असं देखील मंत्री केसरकर यांनी यावेळी जाहीर केले. त्याच बरोबर केंद्राच्या योजनेतून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन निवासी शाळा आणि एक हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळा लवकरच जिल्ह्यात उभारली जाणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन आज कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, कौशल्य विकासचे श्री. चमणकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, कामशिप्र मंडळाचे सहसचिव महेंद्र गवस, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण कार्यक्रम मंत्री दीपक केसकर उपस्थित होते. त्यांनतर त्यांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच जर्मनी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आल्याचे सांगून त्याचा देखील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घाव असे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात तीन निवासी शाळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हुशार विद्यार्थ्यांसाठी एक सीबीएसई शाळा देखील लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हयातील सहा महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा आज शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाला. यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळसह श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर सांगुळवाडी, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सांगुळवाडी, मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड मेनेजमेंट, मालवण, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली या महाविद्यालयाचा समावेश आहे. आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.