You are currently viewing शांतिनिकेतन स्कूल ची गार्गी सावंत विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत पात्र

शांतिनिकेतन स्कूल ची गार्गी सावंत विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत पात्र

शांतिनिकेतन स्कूल ची गार्गी सावंत विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत पात्र

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे यांच्यामार्फत झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल सावंतवाडी प्रशालेची इयत्ता ६ वी विद्यार्थिनी कुमारी गार्गी किरण सावंत हिने १४ वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार यश संपादन केले. दिनांक ५ सप्टेंबर रोजी कणकवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्वल यश संपादन करीत तिने आपली विभागीय स्तरावरील पात्रता सिद्ध केली.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विकासभाई सावंत, कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, उपाध्यक्ष अनंत ओटवणेकर, नारायण देवरकर, सचिव व्ही.बी. नाईक, मुख्याध्यापक समीर परब, सी.ई ओ बाळासाहेब नंदीहळळी व संस्था पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा