*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्याचारितावली*
*काव्यपुष्प-९६ वे*
—————————————–
नामाचा प्रारब्धाशी संबंध आहे ?। तो कसा आहे ? ।
या प्रश्नास उत्तर श्रीमहाराजांनी दिले आहे । ते तुमच्या ध्यानी असो द्यावे सदा ।। १ ।।
म्हणाले महाराज,अहो सामान्यांच्या दृष्टीने । सारे भोग हे देहाचे भोगणे । दुःख-पीडा सहन करणे । क्रमप्राप्त आहे ।। २ ।।
अशा आयुष्याचे काय सांगावे । भोग देहाने भोगावे ।
या देहासाठीच जगावे । सगळेच सामान्य आहे हे ।। ३ ।।
प्रारब्धातले घडणे । तेचि देहास असे भोगणे । होणारी
पीडा दूर करणे । शक्य आहे हो नामाने ।। ४ ।।
जो हे नाम आनंदे घेतो । भोग प्रारब्धाचे भोगतो । तरी आनंदात रहातो । ऐसे तारक असे हो नाम हे ।। ५ ।।
नाम हे श्रेष्ठ आहे । सेवा, प्रार्थना, पूजेत नाम आहे ।
हेच नाम सार्थ आहे । सानिध्यात भगवंताच्या नेते ।।६।।
नामास उपाधी नाही । नाम घेण्या आडकाठी नाही । काळ,वेळ बंधन नाही । नाम घ्यावे,भगवंता जोडावे ।। ७ ।।
************************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।
—————————————–
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे-पुणे.
—————————————–