माजी पंचायत समिती सदस्य श्री संदीप गावडे यांची शिबिराला उपस्थिती..
आंबोली :
आंबोली येथे आयोजित मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उदघाटन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या हस्ते व माजी पंचायत समिती सदस्य श्री संदीप गावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे डॉ.पाटील व त्यांचे सहकारी डॉक्टर व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ छाया नार्वेकर, भाजपा आंबोली गाव अध्यक्ष श्री रामचंद्र गावडे, आंबोली माजी उपसरपंच सौ नमिता राऊत, आंबोली हायस्कूल संचालक श्री विजय परब, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र निरीक्षक श्री गावडे,आशा सेविका, महिला बचत गट, आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात बीपी, शुगर, ECG, आवश्यक वाटल्यास लॅबला पाठविण्याकरिता रक्त व लघवीचे नमुने जमा करणे व इतर आजार व रोग निदान करणे तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणे, आभा कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणे इत्यादी बाबत मोफत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात आंबोलीत अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यात महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.