You are currently viewing समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि धार्मिक वेमन्स्य उभे करणे, कटकारस्थान रचने बाबत प्रथम खबरी अहवाल घेऊन सदरील आरोपींना अटक करणे बाबत…..

समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि धार्मिक वेमन्स्य उभे करणे, कटकारस्थान रचने बाबत प्रथम खबरी अहवाल घेऊन सदरील आरोपींना अटक करणे बाबत…..

समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि धार्मिक वैमन्स्य उभे करणे, कटकारस्थान रचने बाबत प्रथम खबरी अहवाल घेऊन सदरील आरोपींना अटक करणे बाबत…..

वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल

वेंगुर्ले

श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, श्री. नितेश राणे, आमदार आणि इतर संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार अशी की संबंधित एकनाथ शिंदे यांनी आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि आ. नितेश राणे यांनी त्यांच्या फेसबुक आणि द्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून सरकारची खोटी बातमी प्रसारित करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, मानहानी करणे शांतता भंग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत,

या लोक प्रतिनिधींनी खोटी माहिती पसरवून आणि धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे. या व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार या पदांवर असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चुक केली आहे.

या संदर्भात वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सामाजिक न्याय विभागाच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अनुराधा वेर्णेकर, वेगुर्ला तालुका काँग्रेस सरचिटणीस मयूर आरोलकर, आरवली युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश हुनारी, अब्दुल शेख इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा