You are currently viewing वायंगणतड येथील अपघातात घोटगेवाडीतील संतोष शेटकर यांचा मृत्यू

वायंगणतड येथील अपघातात घोटगेवाडीतील संतोष शेटकर यांचा मृत्यू

वायंगणतड येथील अपघातात घोटगेवाडीतील संतोष शेटकर यांचा मृत्यू

टेम्पो चालक हा मद्यपान केलेल्या अवस्थेत; स्थानिकांनी केला आरोप

दोडामार्ग

दोडामार्ग ते तिलारी मुख्य मार्गावर आज मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या स्कूटरला जोरदार धडक बसून अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातात स्कूटर चालक संतोष मधुकर शेटकर, वय वर्षे ५२ रा. घोटगेवाडी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचे निधन झाले. तर स्कूटरच्या मागे बसलेली महिला अलमारी मिंगिस सोच वय वर्षे ५० ही गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले. तर टेम्पो मधील एक महिला तसेच तिचा लहान मुलगा किरकोळ जखमी झाले.

टेम्पो चालक आदम नाईकवाडी वय वर्षे ३२, हा मद्यपान केलेल्या अवस्थेत होता असा आरोप स्थानिकांनी केला. स्कूटरला धडक देऊन टेम्पो रस्ता कडेला पलटी झाला. जखमींना पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ यांनी साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले. वायंगणतड येथे अपघात झाला हे समजताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, सहाय्यक निरिक्षक आशिष भगत, पोलीस रामचंद्र मळगावकर, पोलीस, बाबी देसाई, दिपक सुतार, साटेली भेडशी पोलीस पाटील देसाई, घटनास्थळी दाखल झाले नंतर आरोग्य केंद्र येथे भेट दिली. माहिती घेतली. अपघात ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. दोडामार्ग पोलिसांनी अधिक चौकशीसाठी टेम्पो चालक आदम नाईकवाडी याला ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा