*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लघूलेख*
*पांखरांची शाळा*
पुण्यातील या सोसायटीत रहायला आल्यापासुन आसपास भरपूर झाडे वृक्ष वेली बघायची संवय होऊन गेली.
चारी बाजूंनी हिरवीगार झाडे झुडपे मन आनंदी ठेवत. थंडावा मिळे.
आसपासच्या मोठ्या वृक्षांवर मोठ्या फांद्यांवर छान पक्षांची घरटी होती.
पहाट होताच चिमण्यांची चिवचिव कावळ्यांची कावकाव, पोपटांचा जल्लोष, ऐकता जाग येई. कधी कोकिळेची तान तर रात्री टिटवी घुबड छान ऐकायला येई.
संध्याकाळी सगळे पक्षी येऊन खुपच किलबिलाट करत.
झाडांवरून रात्रीचे शुभ्र बगळे एका रांगेत ऊडत घरी परतत.
संध्याकाळी काम नसलं की बघत बसायची ही मजा.
वृक्षांवर वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांचे समुह बसत व वेगवेगळे चित्र विचित्र आवाज करत.
ही पक्षांची शाळा असणार बहुतेक.
एक मोठा पक्षी ओरडत असे व बाकीचे किलबिलाट. तो मास्तर असणार.
काय शिकत असतील ही मंडळी. , हा मला प्रश्न पडे.
खाऊचा डब्बा, पाण्याची बाटली छडी काहीच कसं लागत नाही?
अर्धा तासात काळोख दाटला की सगळे नाहीसे होत.
बस!इतकीच शाळा.
मजा आहे या पाखरांची.
बरेच दिवस गेले. नविन पक्षी नविन शाळा पण कधीच थांबली नव्हती.
पावसाळ्यात एक दिवस खुप पाऊस वादळ झालं आणि रात्री कडाडकड आवाज करत दोन वृक्ष पडले. त्यांच्या फांद्या आमच्या दोन्ही खिडक्यांवर पडल्याव त्या आपोआप बंद झाल्या. बाहेरचं काही दिसेना.
साफ सफाईत आठवडा गेला. मनाला ऊदास वाटछ लागलं. कूठे गेली ती पांखरे?
आता कूठे असेल शाळा?
आधी ते इवलेसे जीव जिवंत तरी राहिले असतील का?
अनुराधा जोशी
अंधेरी ६९
9820823605